राष्ट्रवादीतले अनेक नेते दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात – महाजन

टीम महाराष्ट्र देशा : ‘आम्ही राष्ट्रवादी सोडून जाणार नाही’, अशी शपथ राष्ट्रवादीला आता घ्यावी लागत आहे. आज अशी शपथ घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र राष्ट्रवादीतले अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. सध्या माझा निम्मा दिवस भाजप प्रवेशाची यादी पाहण्यातच जात आहे, असेही महाजन म्हणाले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, सध्या माझ्याकडे 50 च्या वर लोकांची यादी आहे, जे भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत. माझा निम्मा दिवस ही यादी बघण्यातच जात आहे. माजी आमदारांसोबत आजी आमदारही या यादीत आहेत असेही महाजन यांनी सांगितले आहे.

Loading...

सोबतच मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही, मी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्येही नाही, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाजनादेश यात्रेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून ही यात्रा 7-8 जळगावला येणार आहे. तसेच नाशिकला या यात्रेच्या समारोपाला अमित शाह किंवा नरेंद्र मोदी येतील, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

भाजपच्या ‘या’ महिला नेत्याला फोडत राष्ट्रवादीने दिले भाजपला प्रत्युत्तर

#पक्षांतर : ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील नेते भाजपात येत असतील, तर त्याला आम्ही काय करणार’

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील