जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आता जवळजवळ तीन महिने होत आले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण मंत्रीमंडळाचाही विस्तार झाला आहे. परंतू यावरून विरोधी पक्षनेते सत्ताधाऱ्यांवर सतत टीकेबाजी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनीही मंत्रीमंडळाच्या विस्तारावरून एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याला आता भाजप पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर ?
एकनाथ खडसे यांनी स्वत:ची काळजी करावी. आमची काळजी करू नये, असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, आमचं सरकार सक्षम आहे.
आमचं सरकार सक्षम आहे –
आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही सरकार सांभाळायला आणि विस्तार करायला सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका, तुम्ही स्वत:ची करा, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
एकनाख खडसे यांचे वक्तव्य –
दरम्यान, राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर उद्या सरकार कोसळेल. त्यामुळे राज्यात सरकार कोसळण्याच्या 15 आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी नेत्यांवर टीका केली होती. एकनाथ खडसे प्रसारमाध्यांशी संवाद साधत होते.त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | ‘वंदे मातरम’ ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता?; नाना पटोलेंनी सांगितले ‘हे’ दोन पर्याय
- shane watson । जसप्रीत बुमराह टूर्नामेंटमधून बाहेर पडणे हा भारतीय संघासाठी मोठा धक्का – शेन वॉटसन
- Travel Update | दिवाळीच्या सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ‘या’ जागांचा नक्की करा विचार
- Narayan Rane | बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते – नारायण राणे
- Health Tips | काजू खाल्याने शरीर राहते निरोगी, जाणून घ्या!