खडसे आणि अजित पवारांच्या कानगोष्टींची मलाही उत्सुकता – गिरीश महाजन

टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्या कानात नाथाभाऊ काय बोलले, हे माहिती नाही. तसेच, याबाबत पवारच खुलासा करणार असून, ते कधी करतील याची सर्वसामान्यांप्रमाणेच मलाही उत्सुकता आहे. त्यामुळेच योग्य वेळेची प्रतीक्षा करावी अस सांगत गिरीश महाजन यांनी अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्या कान्गोष्टींवर आपल मत व्यक्त केल आहे.

दरम्यान, जळगाव मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर तेव्हा खडसेंनी पवार यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या. या कानगोष्टींची राज्यभरात चर्चा सध्या संपूर्ण राज्यात सुरु आहे यावर गिरीश महाजन यांनी आपल मत व्यक्त केल आहे. नाशिक मध्ये जिल्हा नियोजन बैठकीसाठी आले असता महाजनांनी हे वक्तव्य केल आहे.