Girish Mahajan | फडणवीसांच्या कानात सांगितल्याचा ‘तो’ दावा एकनाथ खडसेंनी नाकारताच गिरीश महाजनांनी दिलं आव्हान, म्हणाले…

मुंबई : नाशिक येथील कार्यक्रमात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना येऊन भेटले. यावेळी फडणवीसांच्या कानात भेटुन मिटून टाकू, असं खडसे म्हणाले असल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला होता. मात्र हा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळून लावला. यावर प्रतिक्रिया देत गिरीश महाजनांनी खडसेंना आव्हान दिलं आहे.

एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलण्याचं आव्हान :

एकनाथ खडसेंनी कानात सांगितल्याचे साक्षीदार देवेंद्र फडणवीस आहेत. खडसेंनी फडणवीसांसमोर म्हाणावं की मी कानात सांगितलं नाही, असं आव्हान महाजनांनी दिलं आहे. खडसेंचा हा विषय गंभीर घेण्यासारखा नाही, मात्र, यातून ते आमच्यावर टीका करत असल्यामुळे यावर चर्चा होत असल्याचं देखील महाजन म्हणाले.

खडसेंचं स्पष्टीकरण :

सर्वप्रकारे तर त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीची चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशी सुरू आहे. या सर्व चौकशींना मी समर्थपणे सामोरं जाणार आहे, त्यामुळे मिटवण्यासारखं काही राहिलेलं नाही, मी असं काहीच बोललो नाही, असं खडसेंनी उत्तर दिलं होतं.

गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट :

यादरम्यान, काही दिवसांपुर्वी एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांना भेटायला गेल होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सून रक्षा खडसे देखील होत्या. यावेळी महाजनांना माहिती मिळताच त्यांनी रक्षा खडसे यांना फोन करुन माहिती घेतली असल्याचं महाजन म्हणाले.

अमित शहा यांच्या ऑफिस बाहेर आम्ही तीन तास थांबलो मात्र, शहांनी भेट नाकारली असल्याचं रक्षा खडसे यांनी महाजान यांना सांगितलं असल्याचा खुलासा गिरीश महाजन यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : नाशिक येथील कार्यक्रमात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना येऊन भेटले. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics