जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले

girish mahajan.

जळगाव: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुलेटवरून शहराचा फेरफटका मारत प्रचार केला. दरम्यान, महाजन यांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाजनांनी नंबर नसलेली विना हेल्मेट बुलेटचा वापर करीत वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे.

गिरीश महाजन यांनी उमेदवारांकडून जामनेर नगरपालिका निवडणूक प्रचाराची माहिती घेतली. तसेच कार्यकर्त्यासोबत बुलेटवरुन प्रभागात जावून मतदारांशी संपर्क साधला. यावेळी महाजन यांनी वापरलेली बुलेट ही विनानंबरची होती. तसेच बुलेटवरून प्रचार करीत असताना त्यांनी हेल्मेटचा वापर टाळत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे.

एकीकडे शासन वाहतुकीचे नियम पाळा म्हणून जाहिरात करत आहे. तर दुसरीकडे त्यांचेच मंत्री नियम पाळत नसल्यामुळे सामान्य वाहन चालक नवल व्यक्त करत आहेत.