या निवडणुकीत संजय काकडे यांचा ‘क्रीम रोल’ असणार आहे !

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुणे शहर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्याच्या जागेसाठी भाजपकडून अनेक नेते इच्छुक होते. त्यातच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे तर उमेदवारीसाठी चांगलेच आडून बसले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत काकडेंना पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, रात्री उशीरा पुण्याच्या लोकसभेच्या जागेवर गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज वाजत गाजत भाजप पक्ष कार्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी या निवडणुकीत भाजपकडून संजय काकडे यांचा काय रोल असेल असे गिरीश बापट यांना विचारले असता बापट म्हणाले की, या निवडणुकीत संजय काकडे यांचा ‘क्रीम रोल’ असणार आहे.

Loading...

पुढे बापट म्हणाले की, येत्या निवडणूकीत प्रत्येकावर पक्षाने जबाबदारी निश्चित केली आहे. काकडे यांच्यावर देखील चांगली जबाबदारी दिली असून त्यांचा निवडणूकीत क्रिम रोल असेल. कोणाला काय जबाबदारी द्यायची हे पक्षसंघटन ठरवत असतं. त्याप्रमाणे कामाचे वाटप केले जाते. निवडूण येण्याच्या दृष्टिकोनातून हे उपयाेगी पडत असते. जो सक्षम असेल त्याला ती जबाबदारी दिली जाते. आम्ही हातात हात घालून काम करणार आहेत, पायात पाय अडकवणार नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार