fbpx

गिरीश बापटांचा कार्यालयासमोर मराठ्यांचा एल्गार !

girish bapat, maratha andolak

पुणे : राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. या आंदोलनाला राज्यात हिंसेचे गालबोट देखील लागलं आहे. तर काही ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक ठिय्या मांडून बसले आहेत. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून मराठा आंदोलक आता आमदार आणि मंत्र्यांच्या घरांसमोर ठिय्या मांडत आपल्या मागण्या मांडणार आहेत.

या आंदोलनाचा भाग म्हणून पुण्यात आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा येथील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलांनी ठिय्या मांडत आपल्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. दरम्यान, आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या आमदारांची मुंबई येथे बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला गिरीश बापट जाणे अपेक्षित आहे मात्र आज आपण मला भेटायला येणार हा निरोप मिळाल्यावर मी तुमची भेट घेण्यासाठी पुण्यातच थांबलो अस गिरीश बापट हे आंदोलकांशी चर्चा करताना म्हणाले आहेत.

तर आंदोलनात गुन्हे असणाऱ्या तरुणांची यादी द्या जे तरुण हिंसक आंदोलनात नसतील त्यांची यादी मी पोलीस आयुक्तांना देईल अस आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आंदोलकांना दिले आहे. मात्र फक्त एकच हात जोडून विनंती करतो शांततेत आंदोलन करा अस आवाहन देखील बापट यांनी आंदोलकांना केले आहे.

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही १८ जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

अजित पवार नैराश्यातुन काहीही बोलत आहेत – गिरीश बापट

. . . म्हणून मुंबईत मराठा आंदोलन पेटले

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.