गिरीश बापटांच्या फालतू बडबडीने फरक पडत नाही; अजित नवलेंचं प्रत्युत्तर

मुंबई:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

सरकार आणि आंदोलकांमध्ये अनेक चर्चाही झाल्या परंतु, या चर्चेत काही तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देतानाच पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीत कृषी कायद्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आंदोलने शांततेने करावीत. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे करतंय त्यामागे त्यांनी उभं राहावं. कोणाच्यातरी नेतृत्वाखाली जाऊन आपलं नुकसान करून घेवू नये, असं आवाहन भाजप खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. केंद्र सरकारचे कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत, असं गिरीश बापट म्हणाले होते.

दरम्यान, शेतकरी नेते अजित नवलेंनी गिरीश बापट यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजप नेत्यांना बोलायला काय जातं, संपूर्ण देश नरेंद्र मोदींच्या विरोधात गेला आहे. राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सर्व जण एक होऊ आणि भाजपला एकट पाडू, असं नवले म्हणाले. गिरीश बापटांनी फालतू बडबड केली तर त्याचा जास्त फरक पडत नाही, असं प्रत्युत्तर गिरीश बापटांना अजित नवलेंनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP