गिरीश बापटांच ठरलं ! कसबा मतदारसंघांतून देणारा ‘या’ला उमेदवारी

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते गिरीश बापट यांच्यानंतर कोणाची वर्णी लागणार याकडे मतदारसंघातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. यावर खा. गिरीश बापट यांनी सूचक विधान केले आहे. कार्यकर्त्यांना मी न्याय देतो त्यामुळे एका कार्यकर्त्याला तिकीट देणार असल्याचं बापट यांनी सांगितले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना गिरीश बापट यांनी याबाबतची माहिती दिली.

गिरीश बापट म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना न्याय देणारा माणूस आहे. सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात जे नाव असेल तेच सांगितले जाईल. मी म्हणेल ते खरं म्हणण्यापेक्षा खरं तेच मी म्हणेन असा प्रयत्न असेन. तिकीट देण्याचा निर्णय प्रदेश कार्यकारिणी घेणार असून विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाईल की नाही याबाबतही तेच निर्णय घेतील.

दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघातून गिरीश बापट हे पाच वेळा आमदार राहिले आहेत. मात्र बापट लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्या मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांच्यासह नगरसेवक हेमंत रासने यांच्यासह इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे कसब्यातून कोणाला उमेदवारी देयची यावर बापट यांचा शब्द महत्वाचा ठरणार आहे. मात्र बापट यांनी एका कार्यकर्त्यांची निवड करणार असल्याच सांगितल आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मनात काहीशी भीती निर्माण होणार आहे.