fbpx

प्रचारासाठी गिरीश बापटांची अनोखी शक्कल, गाण्यांतून करणार प्रचार

girish bapat

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे. त्यांनी गाण्यांच्या माधमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी गाणी लॉन्च केली आहेत.

हॉटेल सन्मान येथील भाजप शहर कार्यालयात प्रचारार्थ निर्माण केलेल्या प्रचार रथाचे उदघाटन केले. प्रचारासाठी तयार करण्यात आलेली ‘वाजतय संबळ फुलतय कमळ’ तसेच हा ‘यशसूर्य एक राष्ट्राचा’ या दोन गाण्यांचे विमोचन केले. कंटेंट कन्सेप्ट कम्युनिकेशन प्रा. लि या कंपनीने या गाण्यांची निर्मिती केली असून गायक आणि संगीतकार दिग्विजय जोशी यांनी ही गाणी गायली आहेत.

याचप्रमाणे केंद्र सरकारच्या वतीने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांसाठी केलेल्या योजनांची माहिती देणाऱ्या प्रचाररथाचे ही उदघाटन करण्यात आले.