गिरीश बापट यांनी राज्यात तुरडाळीत भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट- धनंजय मुंडे

another-controversial-statement-by-pune-guardian-minister-girish-bapat

पुणे: हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सरू आहे. आज यात्रेचा दहावा दिवस असून पुण्यात वारजेत झालेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. तूरडाळीच्या भ्रष्टाचारावरून त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला.

धनंजय मुंडे म्हणाले, गिरीष बापट यांच्याविरोधात मी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते, की धनंजय मुंडे यांचे आरोप खोटे आहेत. आज कॅगच्या अहवालात स्पष्ट होत आहे. की राज्यात तुरीच्या डाळीत भ्रष्टाचार झाला. असा आरोप मुंडे यांनी केला.