fbpx

वर्षभरानंतर सरकार बदलणार; गिरीश बापट याचं भाकीत

गिरीश बापट

टीम महाराष्ट्र देशा: पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या अस वक्तव्य करून गिरीश बापट यांनी खळबळ उडवून दिली आहे. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात संपन्न झाली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

केंद्रात नाना पाटोळे राज्यात आशिष देशमुख असे अनेक आमदार अश्या भाजपच्या कार्यपद्धतीवर आपली नाराजी व्यक्त आहेतच त्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठत आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे अशात सरकार मधील जबाबदार समजले जाणारे गिरीश बापट यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

2 Comments

Click here to post a comment