दुध भेसळखोरांचे धाबे दणाणले ; 3 वर्ष कारावासचा लवकरच कायदा

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा करणारा कायदा लवकरच करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली आहे. आता दूध भेसळ प्रकरणातील दोषींना तीन वर्षांचा कारावास होणार आहे.

दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी विधानसभेत केली होती. मात्र जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा आणण्यात अडचणी असल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं.

दूध भेसळीबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली. सध्या दूध भेसळखोरांना सहा महिन्यांची शिक्षा आहे. मात्र सहा महिन्यांची शिक्षा असल्यामुळे या प्रकरणात लगेच जामीन होतो.