यामुळे अजित पवार कर्माची फळं भोगतायेत : बापट

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेले आहेत. अनेक नेते विविध ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांवर यांच्यावर चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बापट म्हणाले, अजित पवारांना महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करण्याची सवय होती. पालकमंत्री असताना त्यांना महापालिका आणि जिल्हा परिषद फोनवकरुन चालवली, त्यामुळे ते आता आपल्या कर्माची फळं भोगत आहेत, अशी टीका गिरीश बापट यांनी अजित पवारांवर केली आहे.

तसेच पुढे बोलताना बापट म्हणाले, अजित पवारांनी भाजपच्या कामगिरीवर टीका करत मी पालकमंत्री असताना पुण्याला पाणी कमी पडू दिलं नाही, असे सांगितले.

पवारांच्या या टीकेला उत्तर देताना बापट म्हणाले, पुण्यासाठी समान पाणी पुरवठा योजना तयार आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत पाण्याचा प्रश्न सुटेल. आमच्याकडे महापालिकेच्या कामात पालकमंत्री ढवळाढवळ करत नाहीत. महापौर, सभागृहनेते हे सर्वजण एकत्र बसून निर्णय घेतात. महत्वाचे विषय पालकमंत्री सरकारकडे घेऊन जातात. ही माझी कामाची पद्धत होती. चंद्रकांत पाटीलही असंच काम करत होते, असे बापट यावेळी म्हणाले.

Loading...

Loading...