राष्ट्रवादीला राज्यस्तरीय स्वरुप नाही, राष्ट्रवादी सध्या ‘पश्चिम महाराष्ट्रवादी’ पक्ष : गिरीश बापट

another-controversial-statement-by-pune-guardian-minister-girish-bapat

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भ,मराठवाडा,कोकणात या भागात तुरळक अस्तित्व आहे. या पक्षाला राज्यस्तरीय स्वरुप नाही. त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका भाजप जिंकेल. इंदापुर,बारामतीमध्ये भाजपचा वेग वाढत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष राहिला आहे, अशी खरमरीत टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.

बारामती तालुक्यातील विविध उदघाटने पालक मंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी माळेगांव (ता.बारामती) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बापट बोलत होते.या कार्यक्रमाला खासदार अमर साबळे,आमदार बाळा भेगडे,बाळासाहेब गावडे,चंद्रराव तावरे, रंजन तावरे, रामचंद्र निंबाळकर,तानाजीराव थोरात आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

नेमकं काय म्हणाले गिरीश बापट
बारामतीसह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी मोडीत काढत भाजप ताठ मानेने उभा राहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भ,मराठवाडा,कोकणात या भागात तुरळक अस्तित्व आहे. या पक्षाला राज्यस्तरीय स्वरुप नाही. त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका भाजप जिंकेल. इंदापुर,बारामतीमध्ये भाजपचा वेग वाढत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष राहिला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेले मोर्चे हे हल्लाबोल नसुन डल्लाबोल मोर्चे आहेत.यांनीच मागच्या १५ ते २० वर्षांत मारलेल्या डल्यांमुळे कामे करता आले नाही.सिंचन,रस्ते, जलयुक्त शिवार,पाणीपुरवठा आदीबाबत निर्णय जनतेच्या विरोधात घेतले.