शरद पवारांच्या नावावर मते मागायचे दिवस संपले, बापटांचा राष्ट्रवादीला टोला

मंचर : शरद पवारांच्या नावावर मते मागायचे दिवस संपले आहेत. यापुढे आश्चर्यकारक निकाल लागतील. सर्वत्र कमळ फुलविणार आहे असं म्हणत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. मंचर शहर व आंबेगाव तालुक्यात दहा कोटी ३४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन शनिवारी बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

नेमकं काय गिरीश बापट ?
“शरद पवारांच्या नावावर मते मागायचे दिवस संपले आहेत. यापुढे आश्चर्यकारक निकाल लागतील. सर्वत्र कमळ फुलविणार आहे. संजय थोरात यांनी पक्षाची चांगली बांधणी केली आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना साथ द्यावी. केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनते पर्यंत पोहोचविण्याचे काम करावेभारतीय जनता पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत साहेब,दादा, ताई यांच्या बरोबर टक्कर द्यावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजना व कार्यकर्त्यांच्या जोरावर पुणे जिल्ह्यात इतिहास घडविणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गाव व वाड्या वस्त्यावर बूथ स्थापन करून पक्षाची बांधणी भक्कम करावी.’’