अजित पवार नैराश्यातुन काहीही बोलत आहेत – गिरीश बापट

ajit pawar and girish bapat 2

टीम महाराष्ट्र देशा : तुरडाळ घोटाळ्या संदर्भात केले जाणारे सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. राष्ट्रवादी नेत्यांकडून केवळ प्रसिद्धीसाठी असे आरोप केले जात आहेत असा आरोप गिरीश बापट यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या नियमानुसार तूरडाळ खरेदी केली गेली आहे. धनंजय मुंडेंच्या आरोपात काहीही तथ्य नाही सवंगप्रसिद्धीसाठी धनंजय मुंडे आरोप करत आहेत असा पलटवार गिरीश बापट यांनी केला आहे तर अजित पवार नैराश्यातुन काहीही बोलत असल्याचा घणाघात सुद्धा गिरीश बापट यांनी केला आहे.

दरम्यान, गिरीष बापट यांच्याविरोधात मी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते, की धनंजय मुंडे यांचे आरोप खोटे आहेत. आज कॅगच्या अहवालात स्पष्ट होत आहे. की राज्यात तुरीच्या डाळीत भ्रष्टाचार झाला. असा आरोप मुंडे यांनी केला होता.