“राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले”

गिरीराज सिंह

टीम महाराष्ट्र देशा- ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरबरसले आहेत . कोणताही नेता आपल्या कार्यकर्त्यांना अशा निर्णायक क्षणी पळून जात नाही. राहुल गांधी हे गांभीर्य नसलेले पक्षाध्यक्ष आहेत, अशी मार्मिक टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.

ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन विधानसभांचे निवडणूक निकाल जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. त्रिपुरात भाजपाने ४० जागांवर आघाडी घेतली आहे. तर डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. त्रिपुरा येथील मॅजिक फिगर ३१ आहे. त्यामुळे भाजपाला येथे स्पष्ट बहुमत मिळणार हे स्पष्ट आहे.