हिंदूंच्या सहनशीलतेचा बांध फुटला तर ते काशी, मथुरा आणि अयोध्येवर कब्जा करतील :गिरिराज सिंह

नवी दिल्ली- हिंदूंच्या सहनशीलतेचा बांध फुटला तर ते काशी, मथुरा आणि अयोध्येवर कब्जा करतील. मुस्लिम हे मुगल बादशहा बाबरचे नव्हे, तर रामाचे वंशज आहेत वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केलं आहे

नेमकं काय म्हणाले गिरिराज सिंह?
मुस्लिमांनी राम मंदिर पुनर्निर्माणासाठी मदत केली नाही, तर मला अतीव दुःख होईल, कारण मुस्लिम हे रामाचे वंशज आहेत. तसेच हिंदूंचा संयम सुटल्यास ते मथुरा, काशी आणि अयोध्येवर कब्जा करतील.गेल्या काही दिवसांपूर्वीही त्यांनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं. मला वाटतं आमचा पक्ष मजबूत आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करूच, ज्या प्रकारे शिया मुस्लिमांनी राम मंदिर बनवण्यासाठी मदतीचा हात दिला होता, तशाच प्रकारे इतर मुस्लिमांनीही राम मंदिर बनवण्यासाठी सहकार्य करावं. त्यांनी हट्ट सोडून द्यावा, कारण आपण दोघेही हिंदूंचीच संतान आहोत.

हा देश हिंदुंचा ! मुस्लीमांनी त्यांच्यासाठी पाकिस्तान तयार केला आहे- भाजप आमदार

“….नकार असला तरी मुलीला पळवून आणण्यास मदत करेल”- राम कदम