‘माउंट सीबी १३’ शिखरावरील ‘गिरिप्रेमी’ची मोहीम यशस्वी

पुणे : ‘गिरिप्रेमी’ या पुणेस्थित सुप्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेच्या नवोदित गिर्यारोहक संघाने हिमाचल प्रदेश येथील लाहौल स्पिती भागात वसलेल्या चंद्राभागा पर्वतरांगेतीलसर्वात उंच शिखर ‘माउंट सीबी १३’ (६२६४ मीटर उंच)वरील मोहीम यशस्वी केली. विवेक शिवदे याच्या नेतृत्वाखाली पवन हडोळे, जयंत वाकोडे, संकेत धोत्रे, लोकेश शिंदे व वरुण भागवत या सर्वांनी दुसऱ्या प्रयत्नामध्ये ‘माउंट सीबी १३’वर पाऊल ठेवले. जुलै महिन्याच्या पूर्वार्धात विवेक शिवदे याच्या नेतृत्वाखालील संघ ‘माउंट सीबी १३’च्या मोहिमेवर रवाना झाला होता. पहिल्या प्रयत्नात संघाला शिखरमाथा अवघ्या ४०० मीटर अंतरावर असताना खराब हवामानामुळे परतावे लागले होते. या सर्व प्रयत्नात गिर्यारोहकांजवळील अन्न व खाद्यपदार्थ संपल्यामुळे संघाला मनालीला परतावे लागले होते. मात्र, संघाने हार न मानता दुसऱ्या प्रयत्नासाठी कसून तयारी केली. हवामान चांगले होण्याची वाट बघितली व योग्यवेळेवर शिखर चढाईचा दुसरा प्रयत्न केला. विवेक शिवदे यांने एका लढवय्या नेत्याप्रमाणे मोहिमेचे नेतृत्व केले व सर्व संघाच्या साथीने’माउंट सीबी १३’वर यशस्वी चढाई केली. या दुसऱ्या प्रयत्नामध्ये संघाला अतिउंचीवरील शेर्पा सहाय्यक बाळकृष्ण ठाकूर (चंडी) व गोपाळ ठाकूर यांची बहुमूल्य मदत लाभली. तसेच संपूर्ण मोहिमेदरम्यान नामग्याल नेगी यांनी मार्गदर्शन केले, तर भरत व धीरेंद्र यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले. हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पिती भागामध्ये चंद्रा व भागा या दोन नद्या वाहतात. या नद्यांच्या परिसरामध्ये एकूण ५६ उंच शिखरे असून माउंट सीबी १३ अर्थात माउंट चंद्राभागा १३ हे सर्वात उंच शिखर आहे. तांत्रिकदृष्ट्या हे शिखर अत्यंत अवघड असून चढाई करताना गिर्यारोहकांचा शाररिक व मानसिक तंदृस्तीचा कस लागतो. चंद्रा व भागा या दोन नद्या हिमालयाच्या कुशीत उगम पावतात व लाहौल भागामध्ये तांडी येथे यांचा संगम होतो व पुढे ही नदी काश्मीरमध्ये वाहत जाते. चंद्रा व भागा यांच्या संगम झालेल्या नदीला चिनाब म्हणून ओळखले जाते. चंद्रा व भागा या नद्या हिमालयातील अतिशय दुर्गम भागातून वाहतात व नद्यांच्या दरम्यान उंच पर्वत शिखरांची रांग आहे. तब्बल ५६ शिखरे असलेल्या या डोंगररांगेला चंद्राभागा पर्वतरांग म्हणूनच ओळखले जाते. या शिखरांवरील चढाईसाठी नदी व खडकाळ प्रदेश ओलांडून पुढे जावे लागते, तसेच माउंट सीबी १३ या सर्वात उंच शिखरावरील चढाईसाठी लाहौल भागातील सर्वात मोठी व अवाढव्य व अत्यंत अवघड अशी धाका हिमनदी पार करावी लागते, त्यामुळे या शिखरावरील चढाईचे महत्व अनन्यसाधारण आहे. गिर्यारोहणाच्या प्रसार प्रचाराचे ध्येय असणाऱ्या गिरिप्रेमीने माउंट सीबी १३ या शिखर मोहिमेसाठी तरुण गिर्यारोहकांचा संघ निवडला होता. याचे नेतृत्व विवेक शिवदे या तरुण व प्रशिक्षित गिर्यारोहकाकडे दिले होते. आयआयटी पवई येथे एम. टेकचे शिक्षण घेतलेला विवेक हा सध्या गिरिप्रेमीच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (GGIM)’ येथे पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतो. त्याच्या गिर्यारोहण कौशल्यावर विश्वास ठेऊन ‘गिरिप्रेमी’ने त्याच्यावर जबाबदारी टाकली होती, ती त्याने उत्तमप्रकारे पार पाडली व मोहीम यशस्वी केली. या मोहिमेसाठी कोशा ग्रुप हे प्रायोजक म्हणून लाभले. श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे व मनाली येथील प्रसिद्ध गिर्यारोहक खेमराज ठाकूर यांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ