गिरवली येथे सी सी टीव्ही कँमेरे आणि इ-लर्निंग सुविधेचा उदघाटन सोहळा संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरवली व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी, ता.आंबेगाव येथील दोन्ही मराठी माध्यमांच्या शाळेस गिरवली ग्रामपंचायतच्या वतीने चैदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून इ-लर्निंग संच आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहुल काळभोर यांच्या शुभ हस्ते भेट देण्यात आले या केलेल्या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल  गट विकास अधिकारी काळभोर साहेब यांनी गीरवली ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे कौतुक केले. तसेच सी सी टिव्ही कँमेरा सुरक्षा यंत्रणेचे उदघाटन घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक दत्तात्रय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. वाढती गुन्हेगारी व चो-या यावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य पाऊल उचलल्याबद्दल दराडे  यांनी गिरवली ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे आभार मानले
याप्रसंगी गिरवलीचे सरपंच संतोषशेठ सैद, उपसरपंच कैलासशेठ सैद,ग्रामसेवक बाबाजी चैव्हाण, भैरवनाथ विद्यालयाचे सर्व शिक्षक, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.