पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार ऑनलाईन लिलाव

narendra modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा जन्मदिवस. यानिमित्ताने देशभरात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडूनही एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदींनी देशविदेशात केलेल्या दौऱ्यांदरम्यान त्यांना अनेक भेटवस्तू आणि मानचिन्हे मिळाली. याच भेटवस्तूंचा आता १७ सप्टेंबरपासून ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन लिलाव केला जाणार आहे. तसेच यातून मिळालेले पैसे नमामि गंगे या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिले जाणार आहेत. या वस्तूंमध्ये देशातील ऑलिम्पिकपटूंची खेळाची साधने, अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, चारधामची प्रतिकृती, रुद्राक्ष सेंटरची प्रतिकृती, पेटिंग, वस्त्र आदींचा समावेश आहे. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या दरम्यान हा लिलाव पडणार आहे. हा लिलाव https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाला होणार असून सर्व तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

दरम्यान, लवकरच अमेरिकेमध्ये विविध देशांची बैठक होणार आहे. यामध्ये भारत-अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि जापानचे पंतप्रधान सामील होतील. तसेच या दौऱ्यात तालिबान, चीन आणि कोरोनावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या