गुण वाढवून पाहिजेत मग एक KISS दे; निर्लज्ज शिक्षकाची विद्यार्थिनीला मागणी

Molestation of woman in Dhol squad in Pune

मुंबई: भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे, मात्र नजीकच्या काळात गुरु-शिष्य परंपरेला काळिमा फसवण्याच काम अनेक शिक्षकांकडून केल जात आहे. अशीच एक घटना घाटकोपर परिसरात घडली आहे. यामध्ये शिक्षकाने गुण वाढवून देण्यासाठी विद्यार्थिनीला थेट kiss देण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

झाल अस कि, एका विद्यार्थिनीला इंटर्नल परीक्षेमध्ये कमी गुण देण्यात आले होते, याचे कारण विचारण्यासाठी पीडित विद्यार्थिनी शिक्षकाकडे गेली. मात्र निर्लज्ज शिक्षकाने जास्त गुण हवे असतील तर एक किस देण्याची मागणी केली. शिक्षकानेच केलेल्या अशा वर्तनामुळे पिडीत विद्यार्थीनी प्रचंड तणावाखाली आली होती.

अचानक मुलीच्या स्वभावात बदल आल्याने पालकांनी तिला विचारणा केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी थेट कॉलेज गाठलं. तेथून आरोपी शिक्षकाला घाटकोपर पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल करण्यात आला.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...