घाटकोपर इमारत दुर्घटना शिवसेना पदाधिकारी सुनील शीतपला अटक

ghatkopar building colllasped

 

वेबटीम / मुंबई : घाटकोपर येथील दामोदर पार्कजवळील साईदर्शन ही चार मजली इमारत काल अचानक कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. सरकारकडून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

या दुर्घटने प्रकरणी इमारतीचे मालक असणारे शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितप याला अटक करण्यात आली आहे. शीतप याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, शितप हा शिवसेना पदाधिकारी नसल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे.

साईदर्शन ही इमारत ४० वर्षे जुनी होती. ही इमारत शिवसेना पदाधिकारी सुनील शितप याच्या मालकीची होती. इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचे रुग्णालय होते. तळमजल्यावर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यासाठी इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात येत होते. त्यामुळे इमारत कमकुवत होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.