fbpx

मोदी सरकारची सहा हजार रुपयांची योजना म्हणजे गाजर, छोट्या पुढाऱ्याच्या घणाघात

ghanshyam darode new movie

टीम महाराष्ट्र देशा: शेतकरी प्रश्नावर कायम भूमिका मांडणारा छोटा पुढारी अर्थात घनशाम दरोडेने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नुसतं बोलू नका तत डायरेक्ट क्रिया करा अशी मागणी केली आहे. यावेळी बोलताना घनशामने केंद्र सरकारने दिलेल्या सहा हजार रुपयांत शेतकऱ्याच कसं पोट भागवणार असा सवाल देखील केला आहे. तसेच मोदी सरकारची सहा हजार रुपयांची योजना म्हणजे ‘गाजर’ असल्याची टीका केली आहे.

राजकारण्यांनी निवडणुकीची रस्सीखेच न करता शेतकऱ्याकडे लक्ष द्याव. सरकार शेतकऱ्यांसाठी योजना करते, पण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे सरकारने 6 हजार रुपये देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी घनशाम दरोडेने केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उपोषणासाठी बसले असता सात – आठ दिवस उलटूनही सरकारने दखल घेतली नव्हती, त्यावेळी अण्णांना काय झाल्यास मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा घनशामने दिला होता. तसेच सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करत शेतकऱ्यांच्या समस्या संपवावी अशी विनंती त्याने केली होती.