‘घागर घुमू दे घुमू दे’; प्राजक्ता गायकवाडने शेअर केला गौरी पूजनाचा खास व्हिडीओ

prajkta gaikwad

मुंबई :  समृद्धी व मांगल्यांचे प्रतिक समजल्या जाणा-या महालक्ष्मी अर्थात गौरीचा उत्सव राज्यभरात साजरा केला जातो. काल गौरीचे घरोघरी आगमन झाले, गणपती बाप्पाच्या स्थापने नंतर दोन दिवसांनी गौरी उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या घरी देखील गौराईंचं पूजन करण्यात आले. याचा एक खास व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

दरवर्षी  प्राजक्ताच्या घरी गौरी गणपती  येतात. तिने सुंदर नृत्य करत गौरींची पूजा केली आहे. ‘घागर घुमूदे घुमूदे’ या सुंदर गाण्यावर ती नृत्य करताना दिसते. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच याआधी गौरी आगमनावेळी तिने सोशल मिडीयावर गौराईंना सजवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतरचा तिचा हा व्हिडीओ फारच चर्चेत येत आहे.

दरम्यान, प्राजक्ता गायकवाडने झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत येसूबाईंचे पात्रं उत्तमरित्या साकारले होते. तिची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आणि या मालिकेतील भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर आता ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्याचं देखील तिने सांगितलं होत.

महत्वाच्या बातम्या