चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळेना; राष्ट्रवादीने साजरा केला स्मृतिदिन

ncp pune

पुणे: चांदणी चौक येथे होत असलेली वाहतूक कोंडी याला पर्याय म्हणून भाजपकडून बहुमजली उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन २७ ऑगस्ट २०१७ रोजी करण्यात आले होते. परंतू प्रत्यक्षात उड्डाणपुलाच्या कामाला अजूनदेखील मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे याचा निषेध व्यक्त करत चांदणी चौक येथे राष्ट्रवादीकडून भूमीपूजनाचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौक उड्डाणपुलाचे भूमीपूजन होवून आज नऊ महिने पूर्ण झाले. तरी देखील कामाला सुरवात झाली नाही. तसेच नितीन गडकरी यांनी चांदणीचौक उड्डाणपूलाच्या भूमीपूजनास ९ महिने झाले तरी काम सुरू न झाल्याबद्दल नाराजी  व्यक्त केली होती.

दरम्यान,  सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनांची व भूमीपूजन करूनही कामच सुरू नसलेल्या बाबींची स्मृती करून देण्यासाठी.  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष कुणाल वेडेपाटील यांनी भूमीपूजनाचा स्मृतीदिन साजरा केला. यावेळेस माजी नगरसेवक शंकर केमसे, संघटक सचिव विजय डाकले, शरद दबडे , राजेंद्र उभे, कीर्ती पानसरे, साधना डाकले पदाधिकारी उपस्थित होते.