आगामी महिला क्रिकेट टीम तयार होतेय? धोनीची मुलगी कॅप्टन! बिग बींचे ट्विट

dhoni

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन झालं आहे. विराटने सोशल मीडियामार्फत सर्वांना ही गोड बातमी सांगितली आहे. ‘आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे’ असं आवाहन देखील त्याने केलं आहे.

विराट नंतर विराटचा भाऊ याने देखील सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून नव्या पाहूनचं स्वागत केलं आहे. चिमुकलीच्या आगमनाने विराट आणि अनुष्काचा परिवार देखील फार खुश आहेत. विराटच्या भावाने चिमुलीच्या पावलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

विराट आणि अनुष्काला मुलगी झाल्यानंतर त्यांच्या वरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच ‘बिग बींनी एक ट्विट केले आहे. बिग बींनी केलेल्या ट्विट मध्ये आता पर्यंत किती क्रिकेटपटूंना मुलगी याची लिस्ट शेअर केली आहे, आणि धोनीची मुलगी या टीमची कॅप्टन असेच असे ट्विट बिग बींनी केले आहे. बिग बींचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. बिग बींच्या या ट्विटवर कंमेंटचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या