‘उठ पार्था आता तुझ्याशिवाय पर्याय नाही’

टीम महाराष्ट्र देशा – महाभारतामध्ये सुद्धा एकदा प्रश्न असा झाला श्रीकृष्णाला म्हणावे लागले उठ उर्जुनाला म्हणजे पार्थाला, ‘आता उठ पार्था आता तुझ्याशिवाय पर्याय नाही’ असं म्हणत धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली.

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित होते.

यावेळी मुंडे म्हणले, पाच राज्यांच्या निवडणुकींच्या निकालानं भाजपाचे डोळे पांढरे झाले आहेत. दिल्लीत बसलेल्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा ट्रेलर दिसला आहे. ‘मेरा देश बदल रहा है’ ही जाहिरात दिसेनाशी झाली आहे.

मावळ लोकसभेला मागच्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी निवडणूक हारत आहे. माझी एक व्यक्तिगत विनंती आहे. महाभारतामध्ये सुद्धा एकदा प्रश्न असा झाला श्रीकृष्णाला म्हणावे लागले उठ उर्जुनाला म्हणजे पार्थाला, आता उठ पार्था आता तुझ्याशिवाय पर्याय नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली.