मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारा बाणडोंगरी डीपी रोड असो किंवा आकुर्ली क्रॉस रोड असो, एम.ई.एस नाला रुंदीकरण असो किंवा १८ जुलैच्या अतिवृष्टीमुळे घर गमावलेल्या बाधितांना पर्यायी घरे देणे असो कांदिवली मतदारसंघातील अशी अतिमहत्त्वाची कामे पूर्ण व्हावी याकरिता मी पाठपुरावा करत असताना सुद्धा केवळ फाईल या विभागातून त्या विभागात फिरविण्याचे काम केले जात असल्याचे दिसत आहे, त्यामुळे केवळ कागदी घोडे न नाचवता काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आज भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख समस्या व विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त मनपा आर दक्षिण यांच्या कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात प्रामुख्याने पोयसर डीपी रोड, महिंद्रा कंपनीतून जाणारा डीपी रोड, लोखंडवाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षित भूखंड हस्तांतरण, आकुर्ली रोडवरील मनपा प्रसुतीगृहाचे काम, प्रमोद महाजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सोयी सुविधा उभारणे, बिहारी टेकडी रस्ता, मलनिस्सारण वाहिन्याचे रुंदीकरण संदर्भात यावेळी सूचना देण्यात आल्या.
याशिवाय म्हाडा वसाहतीतील मलनिस्सारण वाहिन्या, पर्जन्यवाहिन्या व सिमेंट रस्त्याची कामे, पोयसर येथील रेल्वे सबवे रुंदीकरण, कांदिवलीतील विविध ठिकाणी असलेली कचरा समस्या, या आणि अशा अनेक समस्या संदर्भात विस्तृत चर्चा करून विकास कामांमध्ये दिरंगाई न करता लवकरात लवकर कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याच्या सूचना सुद्धा भातखळकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगरसेवक शिवकुमार झा, नगरसेविका सुनिता यादव, सुरेखा पाटील, मनपा सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, भाजपा पदाधिकारी सुधीर शिंदे, संजय जैस्वाल, नितिन चौहान आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान म्हणजे गडकरींचे निवासस्थान – विनायक राऊत
- माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर; रामदास कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- खा.रजनी पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
- शिल्पा-राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरोधात कोर्टात ठोकला ५० कोटींचा मानहानीचा दावा
- ‘दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<