fbpx

मुंडे साहेबांचा राजकीय वारसा कोणालाही मिळो; संघर्षाचा वारसा मीच चालवणार- धनंजय मुंडे

gopinath munde and dhananjay munde

जामखेड: “मुंडे साहेबांचा राजकीय वारसा कोणालाही मिळो, मी मात्र साहेबांचा संघर्षाचा वारसा चालवत राहील. तसेच गोरगरिबांचे प्रश्न सोडवत राहील.” असे धनंजय मुंडे म्हणाले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

“मुंडे साहेबांसोबत वीस वर्ष सावलीसारखा उभा होतो. तेंव्हा त्यांच्या बरोबर कोणी नव्हते. साहेबंसाठी तो काळ अतिशय संघर्षाचा व खडतर होता. मुंडे साहेबांसोबत माझे रक्ताचे नाते होते. त्यांची मला रोज आठवण आल्या शिवाय राहत नाही” अश्या भावना भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.