संभाजी भिडेंना मुख्यमंत्री पाठिशी घालत आहेत – विदयाताई चव्हाण

vidhya chawan and sabhaji bhide, devendra fadnvis

नागपूर – भीमा कोरेगाव दंगल घडवून आणणारे…आंबे खाल्ले तर त्यापासून मुलं होतात म्हणणारे… मनुस्मृती ही तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वरांपेक्षा मोठी आहे असे सांगणारे…मनुचे समर्थन करणारे… महिलांच्या विरोधी असलेले… दलितांच्याविरोधी आणि समाजामध्ये तेढ वाढवणाऱ्या संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विदयाताई चव्हाण यांनी मिडियाशी बोलताना केला.

संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले होते. त्यामध्ये आमदार विदयाताई चव्हाण यांनी संभाजी भिडेना मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असल्याचा थेट आरोप केला आहे.

मनुवादी भिडे असून यांना सहा महिने झाले तरी अटक करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्र्यांकडे कायदा व सुव्यवस्था आहे. मुख्यमंत्री सहा महिने झाले उत्तर देत आहेत भिडेंना अटक करु मात्र प्रत्यक्षात ते करत नाहीत. भिडे यांना अटक करावी अशी मागणी सभागृहात केल्याची माहिती आमदार विदयाताई चव्हाण यांनी दिली.

तर मुख्यमंत्र्यांनाच अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी