टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढत्या धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवरील टॅनिंग Skin tanning ची समस्या वाढत चालली आहे. लाखो पर्याय अवलंबून सुद्धा ही टॅनिंग लवकर आपल्या त्वचेवरून जात नाही. त्यामुळे टॅनिंग काढण्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रॉडक्ट्सचा वापर करतो. पण हे केमिकल युक्त प्रोडक्ट वापरून अनेकदा आपल्या त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या टॅनिंगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमची त्वचा चमकदार आणि मुलायम बनवू शकतात.
टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती पद्धती
बेसन आणि हळद
त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी बेसन आणि हळद यांचे मिश्रण सर्वात प्रभावी उपाय आहे. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये अर्धा कप दही आणि लिंबाचा रस मिसळून एक चमचा हळद घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. हे मिश्रण तयार झाल्यावर त्याला साधारण अर्धा तास त्वचेवर राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. नियमितपणे या मिश्रणाचा त्वचेवर वापर केल्यानंतर तुमची टॅनिंग नाहीशी होऊन त्वचा चमकदार बनेल.
मध आणि पपई
पपई ही आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाची ठरते. कारण पपईमध्ये ब्लिचिंग घटक आढळतात. हे ब्लिचिंग घटक आपल्या त्वचेवरील घाण साफ करण्यास मदत करतात. आणि त्याचबरोबर मग आपल्या त्वचेला मॉइश्चराईज करते. यासाठी पपई मध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण तयार झाल्यानंतर ते तुमच्या त्वचेवर लावून तीस मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यानंतर तुमची त्वचा चमकदार आणि प्रभावी दिसेल.
बटाटा आणि लिंबू
बटाटा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे असे आपण नेहमी ऐकत असतो. त्याचबरोबर लिंबाचे देखील आपल्या त्वचेला खूप फायदे होतात. त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा आणि लिंबाचा रस एकत्र करून दहा ते पंधरा मिनिटं त्याने त्वचेवर मसाज करा. मसाज झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने व्यवस्थित धुऊन स्वच्छ करा. यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare । मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; सुषमा अंधारे म्हणाल्या…
- Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Vaibhav Naik | “हिम्मत असेल तर निलेश राणेंनी…”; वैभव नाईकांचं खुलं आव्हान
- Travel Guide | ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा अनोखा संगम बघायचा असेल तर भारतातील ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Viral Video | किंग कोब्राला Kiss करणाऱ्या ‘या’ माणसांचा व्हिडिओ झाला व्हायरल
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका