Share

Winter Hair Care | ‘या’ टिप्स फॉलो करून हिवाळ्यात केस गळतीची समस्या करा दूर

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) येताच आपल्या सोबत अनेक त्वचा (Skin) आणि केस (Hair) समस्या घेऊन येतो. त्याचबरोबर बदलत्या ऋतूप्रमाणे केस गळणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र हिवाळ्यामध्ये केस गळतीचा त्रास, विशेषता मुलींमध्ये जास्त प्रमाणात व्हायला लागतो. हिवाळ्यामध्ये वाढत्या थंडीमुळे केसांची व्यवस्थित निगा न राखल्यामुळे केस गळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये केसांची काळजी जरा जास्त घ्यावी लागते. त्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करत असतो. आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्या फॉलो केल्याने तुमच्या केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

गरम पाण्याचा वापर टाळा

वाढत्या थंडीमुळे आपण गरम पाण्याने अंघोळ करायला लागतो. कारण या ऋतूमध्ये थंड पाण्याने अंघोळ करणे जवळपास अशक्यच असते. अशा परिस्थितीत तुम्ही खूप गरम पाण्याने तुमचे केस धुतल्या केस गळती वाढू शकते. त्यामुळे केस गळती थांबवण्यासाठी कोमट पाण्याने केस धुवा आणि त्याचबरोबर जास्त वेळ पाण्याखाली आपले केस ठेवू नका. त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.

नियमित तेल लावा

हिवाळा येतात केसांमध्ये कोरडेपणाची समस्या निर्माण व्हायला लागते. त्यामुळे आपण केसांना तेल लावणे टाळतो. पण असे न करता हिवाळ्यामध्ये केसांना कोमट तेलाने मसाज केली पाहिजे. यासाठी तुम्ही कोणत्याही तेलाने डोक्याची मसाज करू शकता. विशेषता हिवाळ्यामध्ये डोके धुण्याच्या आदल्या रात्री किंवा केस धुण्याचा एक ते दोन तास आधी केसांना तेल लावून धुवा. असे केल्याने तुमची केस गळती थांबून केस निरोगी दिसायला लागू शकतील.

हिवाळ्यात (Winter) केस गळती थांबवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ गोष्टींचा समावेश करा

आवळा

डॉक्टर आपल्याला नेहमी केसांना आवळा लावायचे सल्ला देत असतात. पण आवळा केसाला लावल्याबरोबरच त्याचा आहारात समावेश केल्यावर देखील आपल्या केसांना खूप फायदे होऊ शकतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आवळ्याचे सेवन केल्याने केसांसोबत आरोग्यही चांगले राहते.

तूप

तुम्हाला जर शक्य असेल तर हिवाळ्यामध्ये रोज तुपाचे सेवन करा. त्याचबरोबर शक्य असल्यास तुमच्या केसांना तुपाने मसाज करा. केसांना तूप लावण्यासाठी तुम्ही ते बोटांनी तूप लावू शकता किंवा कापसाचा उपयोग करून तूप लावू शकता. आयुर्वेदामध्ये केस गळणे थांबवण्यासाठी रात्री पायाला तूप लावणे देखील चांगले मानले जाते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) येताच आपल्या सोबत अनेक त्वचा (Skin) आणि केस (Hair) समस्या घेऊन येतो. त्याचबरोबर बदलत्या ऋतूप्रमाणे …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now