Share

Skin Care Tips | ‘या’ घरगुती पद्धती वापरून चेहऱ्यावरील कोरडेपणा करा दूर

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत अनेक त्वचा (Skin) च्या निगडित समस्या घेऊन येतो. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा जास्त कोरडी व्हायला लागते. त्यामुळे आपण त्वचेची निगा राखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतो. त्यामध्ये अनेक घरगुती पद्धती वापरून आणि बाजारात मिळणारे केमिकल प्रॉडक्ट वापरून सुद्धा आपल्या त्वचेचा कोरडेपणा दूर होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून काही घरगुती सोपे स्क्रब बनवायच्या पद्धती सांगणार आहोत. जे वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणाची समस्या दूर करू शकता.

पुढील स्क्रब वापरून तुम्ही तुमच्या त्वचा (Skin) वरील कोरडेपणाची समस्या दूर करू शकता

मध आणि साखर

त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी मध हा एक सर्वोत्तम स्क्रब करू शकतो. यासाठी तुम्हाला मधामध्ये साखर मिसळून त्याचे व्यवस्थित मिश्रण करून घ्यावे लागेल. मध आणि साखर यांची व्यवस्थित मिश्रण झाल्यावर हलक्या हाताने चेहऱ्याला आणि त्वचेला लावून चोळावे लागेल. हे स्क्रब तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की साखरेची खूप जास्त तुकडे या मिश्रणासाठी घेऊ नका. दहा ते पंधरा मिनिटे या स्क्रबची मसाज झाल्यावर चेहरा साध्या पाण्याने धुवा. या स्क्रबचा नियमित उपयोग केल्यावर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

मध आणि ग्रीन टी

चेहऱ्याची निगा राखण्यासाठी मधाचा आणखी एक स्क्रब तयार केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला मधासोबत ग्रीन टी मिक्स करावे लागेल. मध आणि ग्रीन टीने बनलेले हे स्क्रब तुमच्या त्वचेला व्यवस्थित पद्धतीने मॉइश्चरायझ करतो. हा स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये एक चमचा ग्रीन टी आणि एक चमचा मध घ्यावे लागेल. मध आणि ग्रीन टी या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक ते दोन मिनिटे त्याने चेहऱ्यावर स्क्रब करा. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी देखील हा स्क्रब उपयुक्त ठरू शकतो. हा स्क्रब डोळ्याजवळ रगडू नका हे नेहमी लक्षात ठेवा.

कॉफी

त्वचेला एक्सफोलाएट करण्यासाठी कॉफी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. कॉफीचे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा कॉफी पाण्यामध्ये मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आपल्या सोबत अनेक त्वचा (Skin) च्या निगडित समस्या घेऊन येतो. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा जास्त कोरडी …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now