Share

Skin Care Tips | ‘या’ घरगुती टिप्स वापरून चेहऱ्यावरील काळे डाग करा दूर

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढत्या धूळ आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा (Skin) खराब व्हायला लागते. त्याचबरोबर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसायला लागतो. परिणामी आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडायला लागतात. त्याचबरोबर शरीरामध्ये प्रोटिन्सची कमतरता बसल्यावर देखील चेहऱ्यावर काढण्यात पडायला लागतात. त्यामुळे ते कार्ड काढण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करतो. पण तरीही ते काळे डाग जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आम्ही आज या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला काळे डाग काढण्याच्या काही घरगुती सोप्या पद्धती सांगणार आहोत. ज्याचा उपयोग करून तुम्ही अगदी सहजपणे चेहऱ्यावरील काळे डाग दूर करू शकता.

ग्रीन टी

ग्रीन टी बॅगच्या उपयोगाने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर करू शकता. यासाठी तुम्हाला ग्रीन टी बॅग उकळत्या पाण्यामध्ये तीन ते पाच मिनिटे ठेवावी लागेल. त्यानंतर त्या पाण्यामध्ये कापसाचा बोळा टाकून हलक्या हाताने जिथे डाग आहे तिथे मसाज करा. नियमित असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊन तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल जाणवेल.

लिंबू

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला लिंबू कापून घ्यावे लागेल. आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे त्या डागावर तसेच ठेवावे लागेल. लिंबामध्ये आढळणारे ॲसिड डेड स्कीन काढून टाकतो. परिणामी आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊ लागतात.

कांदा

कांदा आपण नेहमी जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरत असतो. त्याचबरोबर कांदा तुमचं सौंदर्य देखील वाढवू शकतो. चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी कांद्याचा तुकडा घेऊन काळ्या डागांवर त्याची मसाज करा. कांद्यामध्ये आढळणारे आम्ल चेहऱ्यावरील काळे डाग करण्यासाठी दूर मदत करतात.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढत्या धूळ आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा (Skin) खराब व्हायला लागते. त्याचबरोबर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसायला …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now