तयारीला लागा! शिवसेना सोबत असो वा नसो, जिंकणं शक्य !-मुख्यमंत्री

Uddhav-Thackeray and devendra fadnvis

मुंबई : शिवसेनेसोबत युती व्हावी म्हणून भाजप नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी नेहमी युती न करण्याचे संकेत दिले. आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शिवसेना सोबत असो, वा नसो, तयारीला लागा! असे वक्तव्य केले. शिवसेनेशिवायही निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य असल्याचं पालघर लोकसभा पोटनिवडणुकीने दाखवून दिले, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री समोर म्हणाले,यापुढे शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करु. मात्र भविष्यात शिवसेना भाजपसोबत असो, वा नसो पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शिवसेना सोबत असो, वा नसो, तयारीला लागा! असे सांगितले. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेने एकत्र यावं, असं आवाहन केलं. समविचारी पक्षांनी एकत्र यावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मात्र एका पक्षाने युती होत नाही. शिवसेनेने एकत्र यायला हवे, असे दानवे म्हणाले.

देशात १४ ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत दारूण पराभवानंतर भाजपच्या बैठकीवर बैठकी सुरु आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी आला आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केल्यानंतर, भाजपनेही आता एकला चलो रे! भूमिका घेतली आहे.

राज्यात आज पक्षाच्या वतीने अनेक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली बैठक आज सकाळी ११ वाजता दादरमधील वसंत स्मृती भाजप कार्यालयात झाली. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि सर्व जिल्हाध्यक्षांची आज मुंबईत बैठक होणार आहे. तसेच रात्री मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर भाजप मंत्र्यांची बैठक होईल.

Loading...

१४ जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूत लोकसभेच्या ४ जागा तर विधानसभेसाठी १० जागा होत्या. विजयाची घौडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत चांगलाच झटका बसला. भाजपला फक्त २ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपला पालघर लोकसभा मतदारसंघ व उत्तराखंडमधील थराली लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. तर बाकी सर्व जागांवर काँग्रेस व स्थानिक पक्षांचे उमेदवार विजयी झाले.