तयारीला लागा : एमपीएससीच्या परीक्षेची तारीख जाहीर…

Students

मुंबई : कोरोना या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व लॉकडाउनच्या कालावधीचा आयोगाने अभ्यास केला. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल-मे महिन्यात आयोजित तीन परीक्षा सार्वत्रिक हितास्तव पुढे ढकलल्या होत्या. मात्र, आता परिस्थिती सुधारु लागल्याने आयोगाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेत वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थगित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC च्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक आज आयोगाने जारी केलं आहे.

फडणवीसांनी जाहीर केलेल्या मेगाभरतील ‘ठाकरे सरकार’चा ब्रेक…

आयोगाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला होणार असून दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर ला होणार आहे. अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठा कालावधी मिळणार आहे. ही परीक्षा १ नोव्हेंबर ला घेतली जाणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे.

blank

मुंबई आणि पुण्यानंतर ‘ही’ दोन शहरं आहेत कोरोनाच्या निशाण्यावर

आयोगाने या संदर्भात संकेत स्थळावर एक परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान एमपीएसी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानं राज्यभरातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.