Jagga Jasoos- रणबीर गुप्तहेराच्या भूमिकेत!

आगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर जग्गा नावाच्या एका गुप्तहेराची भूमिका बजावणार आहे. यात तो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा शोध घेताना दिसत आहे. साहस आणि मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या सिनेमात रणबीर आणि कॅटरिना एकापेक्षा एक स्टंट करताना दिसणार आहेत.

bagdure

दिग्दर्शक अनुराग बासु ‘बर्फी’ या त्याच्या सिनेमानंतर पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत काम करत आहे. रणबीर आणि कॅटरिनाच्या चाहते या सिनेमाची फार आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात गोविंदाही पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावताना दिसणार आहे. येत्या 14 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

You might also like
Comments
Loading...