इंग्रजी माध्यमांच्या शाळांना न्याय मिळावा – आ. प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे

सोलापूर – महानगरपालिका अथवा कोणत्याही शासकीय शाळांच्या तुलनेने इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही न्याय मिळावा, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात बोलत होत्या .

आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी विनोद कदम, ऐश्वर्या पुजारी, मनीषा देशपांडे, अश्विनी कवडे, अंजली क्षीरसागर, शकीला सय्यद, वर्षाराणी मोरे, किशोर कदम, सरस्वती बनसोडे, निर्मला माने, चेतना कोकाटे यांना गौरवण्यात आले. आदर्श शाळा पुरस्कार नागेश करजगी ऑर्किड स्कूल सोलापूर, एसपी स्कूल नांदोरी तालुका पंढरपूर, इंडियन पब्लिक स्कूल कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर आदर्श संस्था चालक म्हणून अमोल सुरवसे यांना यावेळी पुरस्कृत करण्यात आले.