१ रुपयात मिळवा १४९९ रुपयांचे ब्लुटूथ इअरफोन्स !

'स्नोकोर आय रॉकर ईडब्ल्यूएस'

नवी दिल्लीः विशेषतः तरुणांकडून खरेदी केले जाणारे ब्लुटूथ इअरफोन्स किंवा वायरलेस इअरफोन्स एका खास ऑफर मध्ये मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बजेट स्मार्टफोन बनवणारी कंपनी इनफिनिक्स ने भारतात ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे.

यावेळी कंपनीकडून लोकांना प्रसिद्ध स्मार्टफोन सोबत ईयरबड्स ‘स्नोकोर आय रॉकर ईडब्ल्यूएस’ केवळ एक रुपयात खरेदी करता येवू शकते. इनफिनिक्स डेज सेल दरम्यान केवळ एका रुपयात आपल्या आवडीचे ईयरबड्स खरेदी करता येवू शकतात.

ही ऑफर मर्यादित वेळेसाठी म्हणजे १४ ते १६ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या इनफिनिक्स डेज सेल मध्ये स्नोकोर आय रॉकर ईडब्ल्यूएस ईयरबड्स केवळ एक रुपयांत खरेदी करता येवू शकते. या सेलमध्ये इनफिनिक्स हॉट 9, इनफिनिक्स नोट 7आणि इनफिनिक्स हॉट 9 स्मार्टफोन पैकी एक स्मार्टफोन जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवरून खऱेदी केला तर तुम्हाला फोनच्या डिलिव्हरीनंतर फ्लिपकार्टवर इनफिनिक्स स्नोकोर आय रॉकर ची किंमत केवळ एक रुपये दिसेल. हे केवळ त्याच लोकांना दिसेल ज्यांनी १४ ते १६ जानेवारी दरम्यान इनफिनिक्सच्या या तीन फोनपैकी एक फोन खरेदी केला आहे. सध्या भारतात स्नोकोर आय रॉकर ची किंमत १४९९ रुपये आहे.

भारतात इनिफिनिक्स बजेट स्मार्टफोन इनफिनिक्स हॉट 9ची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. इनफिनिक्स हॉट 9 Pro ची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. तर इनफिनिक्स हॉट 9 मध्ये ६.६ इंचाचा पंच होल डिस्प्ले दिला आहे. इनफिनिक्स Note 7 मध्ये ६.९५ इंचाचा HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. इनफिनिक्स नोट 7 मध्ये ऑक्टा- कोअर मीडिया टेक हेलिओ G70 SoC प्रोसेसर दिला आहे. जो 4GB RAM सोबत 64GB स्टोरेज ऑप्शन मध्ये येतो. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सलचा आहे. इनफिनिक्स नोट 7 मध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या