…त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झाडा – हार्दिक पटेल

hardik patel

टीम महाराष्ट्र देशा– घरी येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. जवळपास 16 हजार लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झाडा असं म्हणत गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने सरकारवर टीका केली आहे.

पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या घरातच आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यावेळी हार्दिक पटेल यांनी राज्य सरकारवर टीका केली.

नेमकं काय म्हणाला हार्दिक ?
घरी येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. जवळपास 16 हजार लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झाडा. चारपेक्षा जास्त लोकांना पोलीस घरी येऊ देत नाहीत. येणाऱ्या लोकांकडे ओळखपत्र मागत आहेत.याचबरोबर, त्यांच्या घरातील पाणी पुरवठा सुद्धा खंडित केलाआहे.