‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळावा तब्बल 1.5 लाखांचा डिस्काऊंट

ह्युंदाय

नवी दिल्ली : आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्या कंपन्यादेखील त्यांच्या कार्सवर अधिकाधिक डिस्काऊंट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात ह्युंदाय इंडिया कंपनी आघाडीवर आहे.

त्याचबरोबर आता ह्युंदाय इंडिया ची कार खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. फेब्रुवारी महिन्यात काही निवडक ह्युंदाय कार्सवर 1.5 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये सँट्रो, ऑरा, ग्रँड i10 Nios , एलेंट्रा आणि कोना या कार्सचा समावेश आहे. ह्युंदायने कोना इलेक्ट्रिक एसयूव्हीवर तब्बल 1.5 लाख रुपयांची सूट दिली आहे. विशेष म्हणजे यात कोणत्याही एक्सचेंज बोनस अथवा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा समावेश करण्यात आलेला नाही. सोबत कंपनी सरकारी कर्मचाऱ्यांना 8000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे.

कंपनीने सादर केलेली नवीन ऑफर केवळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू असेल. ह्युंदायच्या या वाहनांवर दिली जाणारी ऑफर डीलर टू डीलर वेगळी असू शकते. तुम्ही सध्या नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ह्युंदायने तुमच्यासाठी बेस्ट ऑफर सादर केली आहे. दरम्यान कंपनीने ह्युंदाय सँट्रो ही कार त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर 50 हजार रुपयांपर्यंतच्या लाभांसह लिस्ट केली आहे. या हॅचबॅक कारवर 30,000 रुपयांचा रोख डिस्काऊंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जाणार आहे.

ह्युंदाय कंपनी ग्रँड i10 नियॉसवरही डिस्काऊंट देत आहे. या कारच्या पेट्रोल आणि डिझेल वेरियंटमध्ये 60,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यामध्ये 45000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच या गाडीवर 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटही दिला जात आहे.

ह्युंदाई ऑरा या कारवर कंपनीने 70,000 (पेट्रोल आणि डिझेल वेरियंट) रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. इच्छुक ग्राहक 50,000 रुपयांपर्यंतच्या रोख डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकतात. सोबत 15000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे. एलेन्ट्रा या कारच्या पेट्रोल आणि डिझेल वेरिएंट्सवर कंपनीने 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला आहे. ज्यामध्ये 70000 रुपयांचा रोख डिस्काऊंट तर 30000 रुपयांपर्यंतची बोनस ऑफर समाविष्ट करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या