399 चा रिचार्ज करा 3300 रुपये मिळवा

jio sim

मुंबई :धमाकेदार ऑफर्स साठी प्रसिद्ध असलेल्या जिओ ने आणखी एका धमाकेदार ऑफर ची घोषणा केली आहे. 399 या लोकप्रिय ऑफरच्या रिचार्जवर 3300 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. यापूर्वीही जिओने दोन ऑफर आणल्या होत्या. यामध्ये अनलिमिटेड डेटाचा समावेश होता. त्यानंतर आता ही आणखी एक ऑफर आणली आहे.

काय आहे हॅप्पी न्यू ईयर ऑफर?

कंपनीने हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 ची घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपनीने दोन नवे प्लॅन आणले आहेत.हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 मध्ये 199 रुपये आणि 299 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 जास्त डेटाची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी आहे.199 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओच्या ग्राहकांना दररोज 1.2 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज 1.2GB डेटा वापरता येईल.

यापेक्षाही जास्त डेटा लागत असेल तर 299 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळणार आहे. शिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज मिळणार आहेत. 28 दिवसांसाठी याची व्हॅलिडिटी असेल.जिओच्या प्राईम मेंबर्सनाच केवळ या प्लॅन्सचा लाभ घेता येईल.

कॅशबॅक कसा मिळेल?

400 रुपयांचे मायजिओ कॅशबॅक व्हाऊचर्स मिळतील

300 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक माबाईल वॉलेटमधून रिचार्ज करण्यासाठी मिळेल

2600 रुपयांचा कॅशबॅक ऑनलाईन शॉपिंगसाठी मिळेल