वीजबिल मागणाऱ्या सरकारला अस्सल कोल्हापुरी तेल लावलेलं पायताण होतंय व्हायरल!

kolhapur

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात कारखाने आणि घरगुती ग्राहकांना महावितरणने भरमसाठ बिले दिली आहेत. कोरोनाच्या महामारीतून अद्याप कारखाने आणि सर्वसामान्य माणूस बाहेर आला नाही. ही वाढीव बिले कमी करून आकारण्यात यावीत अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे.

राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव विजबिलात दिवाळीमध्ये गोड बातमी दिली जाईल असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अचानक युटर्न घेत विज बिल भरावेच लागेल असं म्हणल्यामुळे अव्वाच्या-सव्वा बिल आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाने, व्यावसायिकांनी भरायचं तरी कसं असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला आहे.

नितीन राऊत यांनी वीज बिल माफीवरून युटर्न घेतल्यानंतर भाजपसह मनसे व इतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसेने राज्य सरकारला सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. सर्वसामान्य नागरिक देखील या बिलांमुळे हैराण झाले असून आपल्या रांगड्या शैलीने प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरकरांनी वीजबिलावरून सरकारला चांगलंच झापलं आहे.

कोल्हापुरी भाषेत दम देत वीजबिलाबाबत सरकारला इशारा देणारा एक बॅनर सद्या प्रचंड व्हायरल होत आहे. या बॅनरवर, ‘सरकारने बिल भरावे, कोरोना काळातील वीज बिल मागणाऱ्या सरकारला..वीज कट करणाऱ्याला..जनतेवर जबरदस्ती करणाऱ्याला..खणखणीत झटका..अस्सल कोल्हापुरी तेल लावलेले पायताण..’ अशा शब्दांत कोल्हापूरकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या