मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या सुंदर चेहऱ्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा आगामी चित्रपट पर्वम हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी साई पल्लवीने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. बॉलीवूड चित्रपट द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने हा नवीन वाद सुरु झाला आहे. यामुळे साई पल्लवी विरोधात आता पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
साई पल्लवी च्या वादग्रस्त विधानानंतर बजरंग दलाच्या नेत्यांनी हैदराबादच्या सुलतान बाजार पोलिस ठाण्यात साई पल्लवी विरोधात तक्रार नोंदवली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओ पाहून कायदेशीर पुढील कारवाई करू. तिचा आगामी चित्रपट ‘विराट पर्वम’च्या प्रमोशनाच्या वेळी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची तुलना गायीची तस्करी आणि लिंचिंगशी केली होती.
"In #KashmirFiles they showed how #KashmirPandits were killed but during lockdown we saw how #Muslims were lynched and people who killed them shouting #JaiSriRam." : #SaiPallavi#VirataParvam pic.twitter.com/mLfRJ32ynj
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) June 15, 2022
काय म्हणाली होती साई पल्लवी ?
साई पल्लवी म्हणाली, ”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत”.
महत्वाच्या बातम्या :