१ जानेवारीपासून करा ओटीपी द्वारे आधार लिंक

आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे.

टीम महाराष्ट्र देशा: तुमचा मोबाईल नंबर जर आधार कार्डशी लिंक केला नसेल तर आता फक्त एका ओटीपी नंबर वर तुमचा नंबर आधार कार्ड सोबत लिंक केला जाणार आहे. १ जानेवारीपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. ‘ओटीपी’ आधारित ही व्हॉइस गाइडेड यंत्रणा अवघा शेवटचा दीडेक महिना शिल्लक असताना ग्राहकांच्या मदतीला धावून येणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि टेलिकॉम कंपन्यांच्या वादामुळे आणि संभ्रमामुळे हा विलंब झाला आहे.

मोबाईल नंबरशी आधार कार्ड क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया मोबाईलधारकांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केली. पण मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये जाऊन ही प्रक्रीया पूर्ण करणे कठीण जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येऊ लागल्या. अद्यापही ५० कोटी मोबाईलधारकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे थेट ओटीपी द्वारे सुरु करण्यात आलेली सुविधा नक्कीच सोयीस्कर असेल हे मात्र नक्की आहे.

bagdure

ओटीपी द्वारे मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत कसा लिंक कराल पहा:

मोबाईलधारकाला इंटरॅक्टीव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमला कॉल करायचा आहे. त्यानंतर हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषेचा पर्याय निवडून, माहिती घेऊन ओटीपी जनरेट करता येईल. ओटीपी व्हेरिफाइड झाला की मोबाईल क्रमांक आधारशी जोडला जाईल

You might also like
Comments
Loading...