गीता फोगटचा रिअल ‘दंगल’

आमिर खान याच्या ‘दंगल’ सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवरही दंगल केली आहे. दोन दिवसात दंगल सिनेमाने ६४ कोटींच्यावर कमाई केली आहे. आमिरसोबतच या सिनेमातील प्रत्येक कलाकारांचं कौतुक केलं जात आहे. या सिनेमाची कथा सत्यघटनेवर आधारित असून भारतीय कुस्तीपटू गीता फोगट हिचा प्रवास या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. या सिनेमात कॉमनवेल्थ स्पर्धेत कशाप्रकारे गीताने गोल्ड मेडल जिंकले होते हे दाखवण्यात आले आहे.

या सिनेमात महावीर फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता-बबीता यांच्या कुस्तीपटू होण्याच्या प्रवासाची कथा आहे. महावीर फोगट यांनी कशाप्रकारे दोन मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कुस्तीपटू बनवलं हे यात आहे. सिनेमाचा भाग म्हणून यात गीता फोगट हिने २०१० साली झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील फायनल सामनाही दाखवण्यात आला आहे. यात गीताने गोल्ड मेडल जिंकून भारताचे नाव त्यावर कोरले होते. (

सिनेमात तर हा सीन्स फारच चांगला जमला आहे. पण प्रत्यक्षात आणि सिनेमातील सीनमध्ये बराच फरक आहे. गीताच्या त्या रिअल सामन्याचा व्हिडिओ यूट्यूबवर व्हिडिओ आहे. तो पाहून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. अर्थातच सिनेमात रंजकपणा आणण्यासाठी ते जरा रंगतदार बनवावं लागतं. पण या निमित्ताने गीताचा तो रिअल सामनाही एकदा पाहण्याची संधी मिळाली आहे.

You might also like
Comments
Loading...