गावितांची ‘हीना’ होणार ‘वळवींची’ सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर महाराष्ट्रातील माजी मंत्री विजय गावित यांची कन्या नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित या मुंबईस्थित डॉ. तुषार वळवी यांच्याशी विवाहबंध होत असून त्यांचा साखरपुडा आज नंदुरबार पार पडला आहे. डॉ.तुषार वळवी हे वैद्यकीय पदव्युत्तर असून ते मूळचे हातधुई (ता. धडगाव जि. नंदुरबार) येथील आहेत. सध्या ते मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत.तर हीना गावित या सुद्धा डॉक्टर आहेत.

खासदार डॉ. गावित यांचा जन्म २८ जून १९८७ ला झाला असून त्यांचे शिक्षण मुंबईत एमबीबीएस एमडी झाले आहे. त्यांचे वडील माजी मंत्री व नंदुरबारचे विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित आहेत.डॉ. हिना या वैद्यकीय शिक्षण घेत असताना मार्च २०१४ मध्ये दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला व प्रथमच नंदुरबार लोकसभा निवडणूक लढवली.

Loading...

त्यांनी कॉंग्रेसचे सलग नऊ वेळा खासदार राहिलेले मातब्बर नेते माणिकराव होल्ड्या गावित यांचा १ लाख ६९०५ मतांनी पराभव करीत इतिहास रचला. त्या सर्वात तरुण आणि उच्च शिक्षित खासदार ठरल्या. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा २०१९ मध्ये त्या पुन्हा भाजपकडून खासदार म्हणून निवडून आल्या. संसदीय कामकाज करताना त्यांनी आरोग्य तसेच कुपोषणाच्या विषयावर मुद्देसूद मांडणी करत संसदेचे लक्ष वेधून घेतले.

आदिवासी भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्तता मिळावी यासाठी त्यांनी उज्वला गॅस योजना अंतर्गत दीड लाखावर गॅस वितरण केले. खासदार गावित यांनी आजपर्यंत ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, न्यूझीलॅंड, सिंगापूर, इंग्लंड, स्वित्झर्लंड आदी देशांचे परदेश दौरे संसदीय मंडळाच्या बरोबर केले आहेत. या दौऱ्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत पंतप्रधान मोदी यांच्या गूड बुक मध्ये स्थान मिळवले आहे.आता त्या लग्नाच्या बेडीत अडकत आहेत.त्यांना भावी आयुष्यासाठी महाराष्ट्र देशा कडून शुभेच्छा !

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं