दिवाळीची बंदूक समजून दुर्लक्ष केले तो निघाला गावठी कट्टा !

pistol

औरंगाबाद : शेतात सापडलेल्या गावठी कटटयाला नोकराने खेळणे समजून दुर्लक्ष केले मात्र ती खरोखरची बंदूक असल्याचे समजताच सगळयांचे धाबे दणाणले. ही घटना नागपुर- मुंबई महामार्गावर शिवराई शिवारात बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश चव्हाण यांच्या शेतात घडली.

चव्हाण यांच्या शेतातील कामगार सकाळी शेतात जात होता. तो रस्त्यावरून शेतात जात असतानाच त्याला बांधावर पिस्तूलसारखे शस्त्र दिसले. सद्या दिवाळीच्या सणामुळे फटाके फोडण्याचे पिस्तूल असेल असे समजून त्याने प्रथम दुर्लक्ष केले. मात्र काही वेळानंतर त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्याला ते खरोखरच पिस्तूल असल्याचे दिसून आल्याने त्याने पळत जावुन चव्हाण यांना सांगितली सगळयांनी ती बंदुक पाहिली आणि पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून कट्टा जप्त करण्यात आला आहे.